पिंपरी / चिंचवड

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार : तरुणीचा केला तीन वेळा गर्भपात

पिंपरी l प्रतिनिधी

एका तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले. दरम्यान तरुणी तीन वेळा गरोदर राहिली. तिन्ही वेळा तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. हा प्रकार 15 जानेवारी ते 13 एप्रिल या कालावधीत जेएसपीएम कॉलेज शेजारी, ओयो टाऊन हाउस वाकड येथे घडला.

आकाश बुचडे (वय 26, रा. मारुंजी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीसोबत ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्न करण्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण एकत्र राहू असे सांगून तरुणीला जेएसपीएम कॉलेज शेजारी, ओयो टाऊन हाउस वाकड येथे नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार वारंवार घडला. त्यातून पिडीत तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली. तरुणाने तिला तीन वेळा बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button