व्हिस्कीमध्ये नशेचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Rape_-_Molestation_-_Sexual_Ha-e1633238918255.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
मैत्री करून तरुणीला बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे व्हिस्कीमध्ये नशेचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार बलात्कार करून तरुणीकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले. ही घटना सन 2016 पासून 5 मे 2022 या कालावधीत बालेवाडी आणि चिंचवड येथील हॉटेलवर घडली.
याप्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंकज अनिल खंडागळे (वय 28, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला मैत्रीच्या संबंधातून बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला व्हिस्कीमधून नशेचे औषध पाजले. तरुणीला बेशुद्ध करून आरोपीने तिच्यावर जबरी संभोग केला. त्याचे व्हिडीओ आरोपीने तयार केले. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे पैशांची मागणी केली. तसेच फिर्यादी तरुणीला आरोपीने चिंचवड येथील एका लॉजवर सहा ते सात वेळा नेऊन मनाविरुद्ध संभोग केला. आरोपीने फिर्यादीकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले. फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन जबरी संभोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.