पिंपरी / चिंचवड
शिवशाही व्यापारी संघातर्फे साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

पिंपरी, (महाईन्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर व शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष- युवराज दाखले यांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष दाखले यांच्यासह सचिव आशिष वाळके, प्राध्यापक धनंजय भिसे, शिवसेना विभागप्रमुख संजय ससाणे, आरूण जोगदंड, आमोल तेलंगे, आर्जून दाखले, भिमा वाघमारे, बहुजन विकास अघाडीचे अध्यक्ष संजय धुतडमल, आण्णा कसबे, मोहन वाघमारे, भिम वाळके, सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे, तुकाराम शिंदे, सचिन तेलंगे, सचिन घोलप, हनुमंत कसबे, दशरथ सकट आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





