पिंपरी / चिंचवड

गुंगीकारक औषध पाजून तरुणीवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

एका तरुणाने तरुणीसोबत बोलायचे असल्याचे म्हणून तिला घरी नेले. तरुणीला कोल्डड्रिंकमधून गुंगीकारक औषध दिले आणि बेशुद्ध केले. त्यांनतर तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार 23 मे मध्यरात्री एक ते पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत मारुंजी येथे घडला.

शुभम विनायक बने (वय 19, रा. रत्नागिरी) याला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला ‘मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे’ असे म्हणून त्याच्या गाडीवर बसवून त्याच्या घरी नेले. घरी गेल्यानंतर आरोपीने तरुणीला कोल्डड्रिंकमधून गुंगीकारक औषध दिले आणि बेशुद्ध केले. त्यांनतर तरुणीच्या इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध केले. तसेच पिडीत तरुणीला घरातून बाहेर जाण्यास आरोपीने मज्जाव केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button