पिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत जवळीक साधून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 12 ऑक्टोबर 2018 पासून 20 मे 2022 या कालावधीत आरटीओ रोड मोशी आणि चाकण येथील एका हॉटेलवर घडला.

प्रवीण भीमराव पाटील (वय 35, रा. वल्लभनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादिसोबत ओळख केली. ओळख झाल्यानंतर आरटीओ रोड मोशी येथे आरोपीने फिर्यादिसोबत जबरदस्ती केली. त्यांनतर फिर्यादिसोबत जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी महिलेच्या घरी आणि चाकण येथील एका हॉटेलवर नेऊन आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button