अविवाहित तरुणीवर बलात्कार आणि गर्भपात
![Accused of raping NCP corporator's son](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/rape_clipart.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. ही घटना ऑगस्ट 2018 ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये घरकुल चिखली येथे घडली. दरम्यान तरुणी गरोदर राहिली. तरुणाने लग्नाचे अमिश दिल्याने त्याच्या सांगण्यावरून तिने गर्भपात केला.
भावेश (वय 28, रा. घरकुल, स्पाईन रोड, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. 16) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भावेश याने पीडित तरुणीला ऑगस्ट 2018 मध्ये त्याच्या घरकुल चिखली येथील फ्लॅटवर बोलविले. त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले. या संबंधातून पीडित तरुणी गरोदर राहिल्यावर 23 ऑक्टोबर 2021 रोजी तिचा गर्भपात केला. त्यानंतरही आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देऊन लग्न करण्यास टाळाटाळ करीत तरुणीची फसवणूक केली. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.