TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली गावठाण येथे खेळ रंगला पैठणीचा

– स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी । प्रतिनिधी

विनायक (आबा) मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन व श्रीराम वरदायिनी सखी मंच यांच्या वतीने चिखली गावठाण येथे न्यू होम मिनिस्टर,खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शखाली, श्री विनायक आबा मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन व श्रीराम वरदायिनी मंचच्या मार्गदर्शनाखाली ‘ न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम चिखली गावठाण येथे पार पडला.


यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्पर्धेचा आनंद लुटला. अगदी आठ वर्षापासून साठ-सत्तर वर्षापर्यंतच्या महिला स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या.विजेत्यांना पैठणी तसेच आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.त्यामुळे महिलांनी एकच जल्लोष केला. तसेच, महिला बचत गटातील सदस्यांच्या यावेळी सन्मान करण्यात आला.
महिलांनी केला एकच जल्लोष…
स्पर्धेच्या वेळी महिलांनी उखाणे घेत पालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत विनायक (आबा) मोरे यांना प्रतिनिधी म्हणून पालिकेच्या सभागृहात पाठवायचे आहे असा एकच जल्लोष केला

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button