Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
स्वायत्त महिला प्रतिष्ठानच्या वतीने वृद्धाश्रमात रक्षाबंधन
![Rakshabandhan in the old age home on behalf of the Autonomous Women's Foundation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Webp.net-compress-image-6-e16296.jpg)
पिंपरी – चिंचवड येथील स्वायत्त महिला प्रतिष्ठानच्या वतीने काळोखे येथील वृद्धाश्रमात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.याप्रसंगी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, क्षमा धाडगे, जयश्री वीरकर, कांचन राजकर, संगीता कांबळे, नीरजा देशपांडे, संतोष जॉय, मीना झाल्टे, व्हिक्टर सॅवियो, धीरज चंडालिया आदी उपस्थित होते.
बहीण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वृद्धाश्रमातील वृद्धांना देखील या सणाचा आनंद घेता यावा याउद्देशाने स्वायत्त महीला प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.