breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड येथील रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

कामगार नेते इरफान सय्यद यांचा पुढाकार : विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून केला आनंदोत्सव

पिंपरी : चिंचवड येथील रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवडणूक बिनविरोध झाली असून निवडणूक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.यू.आर.थिटे साहेब यांनी निकाल घोषित केला. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान सन २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक साठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी कऱण्यात आल्या. शब्दाला जागणारे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांना निष्टेने मानणारा सभासद वर्ग व त्यांच्या दूरदृष्टीचे प्राबल्य यावेळी दिसून आले. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सतीशजी कंठाळे , उपाध्यक्षपदी श्रीकांत मोरे, सचिव ज्ञानेश्वर घनवट, खजिनदार रोहित नवले, संचालक भीवाजी वाटेकर, शंकर महादेव निकम, ज्ञानेश्वर अवताडे, विजय शिवाजी खंडागळे, ओव्हाळ बाळू यशवंत, पुजारी सुभाष तुकाराम, चोरे संदीप शांताराम, श्रीमती. पुष्पा दिनकर काळे, श्रीमती, ललिता चंद्रकांत सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हेही वाचा    –      महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार, सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

याप्रसंगी इरफान सय्यद म्हणाले, कामगारांनी कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतः उभे राहणे गरजेचे आहे. अनेक खाजगी बँका कामगारांना कर्ज देताना दुजाभाव करतात. कागपत्रांसाठी अडवणूक होते. त्यामुळे कर्जाअभावी कामगारांची फरफट होते. मात्र, आज सहकार क्रांतीमुळे माथाडी कामगारांच्या मदतीसाठी सहकारी पतसंस्था धावून येत आहेत. रायरेश्वर देखील त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. कामगारांच्या जीवनात आर्थिक समृद्धी निर्माण करणेसाठी तसेच उन्नतीसाठी कार्यरत आहे. पतसंस्थेचा कारभार माथाड़ी कामगारांच्या माध्यमातून चालवला जात असताना तो प्रामाणिक आणि निस्वार्थ भूमिकेमुळेच आज संस्थेस ऑडिट वर्ग अ चा दर्जा प्राप्त आहे आणि . गेल्या ३२ वर्षापासून माथाडी कामगारांच्या गरजा भागविणारी आदर्श पतसंस्था म्हणून तिला बहुमान मिळाला आहे, असे गौरवोदगार काढीत कार्यकारी मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष सतीश कंठाळे यांनी निवडणूक बिनविरोध व निर्विघ्नपणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका निभावणारे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, पांडुरंग कदम, प्रविण जाधव,सर्जेराव कचरे,नागेश व्हनवटे, पांडुरंग काळोखे,अमित पासलकर,बबन काळे, बाबासाहेब पोते,समर्थ नायकवाडे,गोरक्ष दुबाले, दादा कदम,उद्धव सरोदे,अशोक साळुंके, विठ्ठल इंगळे, ज्ञानेश्वर पाचपुते,कैलास तोडकर,धर्मा कदम, आयुष शिंदे रत्नाकर भोजने, व संघटनेचे सर्व पदाधिकारी, मुकादम कामगारांचे तसेच संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश पवार, अभिजीत शेलार यांचे विशेष आभार मानले. तसेच संस्थेची आर्थिक घौडदोड़ उत्तमरित्या चालवून सभासद आणि कामगार वर्गाच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविण्याचा संकल्प केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button