breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘‘वादळाची चाहूल, आपला राहुल… हवे चिंचवड छान तर करा विकास ऑन’’; राहुल कलाटे यांचे ‘ब्रँडिंग’

पिंपरी: चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतलेले राहुल कलाटे यांची प्रचारपत्रके लक्ष वेधून घेत आहेत. ‘वादळाची चाहूल आपला राहुल’ तसेच  ‘हवं  चिंचवड छान तर   करा विकास ऑन’ ही प्रचार पत्रके बरेच काही बोलून जातात. मतदारांना आकर्षितही करतात.

राहुल कलाटे यांनी चिंचवड मतदारसंघातून महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती .मात्र ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने त्यांनी शिट्टी या चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. पुरेशा व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,वाहतूक कोंडी पासून मुक्तता, सुयोग्य कचरा व्यवस्थापन ,ऑक्सिजन पार्क ,दर्जेदार शिक्षण सुविधा , स्वयंरोजगार, महिलांची सुरक्षितता, जुलमी शास्ती करापासून मुक्तता, रिंग रोड बाधितांना न्याय, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न वा मेट्रो सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असो अडचणी सांगण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांच्या हितासाठी कायमच आक्रमक पवित्रा घेतलेल्या कलाटे यांची प्रचार पत्रके ही तशीच आक्रमक आणि आकर्षक आहेत.

‘वादळाची चाहूल आपला राहुल ‘जनतेच्या मनातला उमेदवार राहुल कलाटे, तसेच हवं चिंचवड छान तर करा विकास ऑन चिंचवडच्या हक्काचं चिंचवडला कधी मिळालंच नाही जनतेसाठी आवाज उठवेल असं नेतृत्व कधी मिळालंच नाही आता जनता झाली ऑन जाऊन विधानसभेत वाढवेल राहुल दादा आमदारकीची शान असा आशय असलेली ही पत्रके बरेच काही बोलून जाणारी आणि मतदारांना आकर्षित करणारी ठरत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button