आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलचा १० वीचा निकाल १०० टक्के!
अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण; यशाची परंपरा कायम

पिंपरी चिंचवड | वडमुखवाडी (आळंदी रोड) येथील आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलने (RKLGIS) सीबीएसई १० वी बोर्ड परीक्षेत यंदाही देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून ‘अनस्टॉपेबल एक्सलन्स’चे दर्शन घडवले आहे.
१००% निकाल: शाळेतील सर्व विद्यार्थी विशेष श्रेणीत (Distinction) उत्तीर्ण झाले आहेत.एकूण बॅचपैकी ५०% विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. शाळेचे टॉपर सई तापकीर ९७% गुणांसह प्रथम, तर रुचीता छाजेड हिने ९६.४% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.
हेही वाचा : खरातसारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर येतात; राज ठाकरे
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने आणि शिक्षकांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. “केवळ मार्क मिळवणे हे आमचे उद्दिष्ट नसून, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि कष्टाला योग्य दिशा देणे हेच आमच्या यशाचे गमक आहे,” अशा शब्दांत शाळेने आनंद व्यक्त केला आहे. या यशाबद्दल परिसरातील नागरिक आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचे व शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अभिनंदन होत आहे.
गुणवंत विद्यार्थी…
शाळेतील वेदांत घाईत, नेत्रा बोरगावकर आणि ऋतुराज पाटील यांनी प्रत्येकी ९६% गुण मिळवले आहेत. प्रणीत पवार (९५%), समिधा जाधव (९४%) आणि प्रेयांश साहू (९४%) यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. याशिवाय पूर्वा पुणसे, शिवम निकम, आयुष देशमुख, निमिर्ती साळुंखे, अभिनव ठाकरे, श्रावणी शिंदे, इफ्रा मल्लादी, प्रथमेश बालटे, ध्रुव गोमे आणि आयुष बोरले यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.




