‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योग्य राज्यकर्त्यांचे प्रतीक’; योगेश बहल

पिंपरी चिंचवड : राजमाता अहिल्यादेवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या. आपल्या बुद्धिमत्ता व चांगुलपणामुळे त्यांनी शेतकरी, राज्यातील नागरिकांचे जीवन सुखकारक केले उत्तम राज्यकर्त्यांचे प्रतीक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे उदाहरण सांगता येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने मोरवाडी चौक, पिंपरी येथील अहिल्यादेवींच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
हेही वाचा – ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’; माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान
यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, मा.सभापती विजय लोखंडे, नगरसेवक मायला खत्री, , प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, उद्योग व व्यापर सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, महिला कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, उपाध्यक्ष संपतराव पाचुंदकर, गोरोबा गुजर, प्रदीप गायकवाड, देवी थोरात, रविंद्र सोनवणे, शहर महिला उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के, महेश शिरूडे, धनाजी तांबे, सुनिल आडागळे उपस्थित होते.