पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार बाबा कांबळे यांना प्रदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/mahaenews-69-780x470.jpg)
पिंपरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरामध्ये देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार 2024 यावर्षी कष्टकरी व कामगारांचे नेते बाबासाहेब कांबळे यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
यावेळी आमदार अश्विनीताई जगताप, भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नाना काटे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी पक्षनेते एकनाथ ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, श्री. हराळे साहेब श्री. लांडगे साहेब, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय ताणले, सदस्य राजूभाऊ दुर्गे, गणेश खरात, बंडू मरकड, वीना सोनवलकर, आशाताई काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हा सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मोरवाडी पिंपरी येथे मोठ्या उत्साहामध्ये आज पार पडला.
हेही वाचा – ‘विधानसभेच्या २५ जागांची संभाजी ब्रिगेडची मागणी’; ॲड. मनोज आखरे
याप्रसंगी बोलताना बाबा कांबळे म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी या कर्तव्यनिष्ठ विज्ञानवादी व राजधर्म पाहणाऱ्या होत्या, राजधर्म पाळत असताना सत्याची बाजू घेऊन त्यांनी निर्णय घेतले. पुणे येथे नुकतेच एका बिल्डराच्या मुलाने दोन व्यक्तींना चिरडून ठार मारले, त्या नाबालिक दारुड्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या बिल्डर बापाने सर्व यंत्रणा खरेदी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी ब्लड सॅम्पल देखील बदलण्यात आले, आशा या परिस्थितीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित होते. आज हे विचार समाजाच्या तळागाळामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे. त्यांचा नावाने मला पुरस्कार दिला गेला, हे मी माझे भाग्य समजतो. या पुरस्कारामुळे ऑटो टॅक्सी व गोरगरीब कष्टकऱ्यांच्या लढ्याला बळ मिळेल असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.