Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

कॅनडियन एज्युकेशन कौन्सिलकडून पुण्याच्या ‘प्रियदर्शनी स्कूल’चा गौरव

शिक्षण विश्व : शहरातील 'टॉप ५' प्रीस्कूल्समध्ये स्थान

पिंपरी-चिंचवड | पुण्यातील शिक्षणाच्या दर्जात सातत्याने आघाडीवर असलेल्या प्रियदर्शनी स्कूलने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. ‘कॅनडियन एज्युकेशन कौन्सिल – इंडिया’ (CEC) आणि ‘कौन्सिल फॉर क्वालिटी अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन’ (CQ-ECCE) तर्फे पुण्यातील ‘टॉप ५’ प्रीस्कूल्समध्ये प्रियदर्शनी स्कूलची निवड करण्यात आली आहे. या विशेष कामगिरीबद्दल कॅनडियन एज्युकेशन कौन्सिलच्या रिजनल डायरेक्टर सुनिता कृष्णन यांनी शाळेला अधिकृत भेट देऊन संस्थेचा गौरव केला.

जागतिक दर्जाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब

या भेटीदरम्यान सुनिता कृष्णन यांनी शाळेच्या कॅम्पसची पाहणी केली आणि येथील नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “जागतिक स्तरावरील शिक्षणाचे जे निकष आहेत, त्याची पूर्तता प्रियदर्शनी स्कूल अतिशय सक्षमपणे करत आहे. हा सन्मान म्हणजे शाळेच्या संपूर्ण ‘लर्निंग कम्युनिटी’ने घेतलेल्या कष्टांचे फळ आहे.”

हेही वाचा     :            विकसित भारतासाठी युवा पिढीचा सहभाग आवश्यक : डॉ. गिरीश देसाई  

​तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती

​या सोहळ्यासाठी ‘क्युरीयस लर्नर्स प्री-स्कूल’च्या संस्थापक-संचालिका आणि CQ-ECCE पुणे विंगच्या अध्यक्षा मिस सरिता पुरस्वानी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी बालशिक्षण (Early Childhood Education) आणि भविष्यातील शैक्षणिक परिसंस्थेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

​”हा क्षण आमच्यासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. या गौरवमुळे आमच्या व्हिजनला अधिक बळ मिळाले असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या ध्येयाला नवी प्रेरणा मिळाली आहे.”

– सारिता सिंग (CEO, प्रियदर्शनी स्कूल, आळंदी)

​पालकांकडून कौतुकाचा वर्षाव

​प्रियदर्शनी स्कूलला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे पालक आणि शिक्षण क्षेत्रातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुण्यातील मोजक्या आणि दर्जेदार शाळांच्या यादीत मानाचे स्थान मिळाल्याने शाळेचा नावलौकिक अधिकच उंचावला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button