Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे ग्रँड चॅलेंज टूर : पिंपरी-चिंचवडमधील स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पिंपरी-चिंचवड | पुणे ग्रँड चॅलेंज टूर–२०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या शासकीय व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

पुणे जिल्हा प्रशासन, बजाज आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २३ जानेवारी दरम्यान ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ ही युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ही स्पर्धा होणार आहे.

हेही वाचा       :          ‘त्या’ पक्षाने जनतेचा विश्‍वास गमावला…; मुंबईच्या राजकारणावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

या स्पर्धेचा पहिला टप्पा मंगळवार, २० जानेवारी रोजी टी.सी.एल. सर्कल, हिंजवडी फेज–३ येथून सुरू होणार आहे. ही स्पर्धा टी.सी.एस. सर्कल, मेगापोलीस सर्कल, सिंफोनी सोसायटी समोरून उजवीकडे वळून बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेश करणार असून, डोणे फाटा येथून पुन्हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे. पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) येथून आढले बुद्रुक, बेबड ओहळ, चांदखेड, कासारसाई, नेरे, मारुंजी, लक्ष्मी चौक, भुमकर चौक, डांगे चौक अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरून रिव्हर व्ह्यू चौक, वाल्हेकरवाडी येथे पोहोचून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत येथून डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी येथे या टप्प्याची समाप्ती होणार आहे.

स्पर्धेदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल, गर्दी व सुरक्षिततेच्या कारणास्तव स्पर्धा मार्गावरील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button