पुनावळे प्रीमियर लीग २०२६ : रायगड किंग्स विजयी!
स्पोर्ट्स अपडेट्स : राहुल काटे यांच्या संघाने मारली बाजी

पिंपरी-चिंचवड | पुनावळे प्रीमियर लीग २०२६ मध्ये रायगड किंग्स संघाने आपल्या दमदार खेळाने अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावले. कर्णधार सौरभ काटे यांच्या नेतृत्वाखाली संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि समन्वित खेळ सादर केला. फलंदाजीतून, गोलंदाजीतून आणि क्षेत्ररक्षणातली जबरदस्त कामगिरी करत रायगड किंग्सने विरोधकांना पराभूत केले आणि प्रेक्षकांना रोमांचक क्षण अनुभवायला लावले.
पुनावळे प्रीमियर लीगचे आयोजक संतोष ढवळे, शिवाजी बांदल, किशोर बांदल, साचिन काटे, अक्षय पांढरे, गिलेश बोरगे, श्री कारे, रतनेश बोरेगे आणि सचिन पांढरे यांनी आयोजन केले. रायगड किंग्सने अंतिम सामन्यात निर्णायक धावसंख्या सहज गाठली आणि प्रतिस्पर्धी संघाला धावसंख्या गाठता आली नाही.
हेही वाचा : ..तर मला डोनाल्ड ट्रम्पही चालतील; राज ठाकरे काय म्हणाले?
संघमालक राहुलभाऊ काटे यांनी विजयाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले, “हा विजय संपूर्ण संघाच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा निकाल आहे. आम्ही पुढील स्पर्धांसाठीही सज्ज आहोत आणि स्थानिक क्रिकेटला आणखी उजाळा देण्यासाठी काम करत राहू.” स्पर्धेत शिवनेरी चॅम्पियन्स, लोहगड हिरोज, सिंहगड लेजेंड्स, तिकोना पॉवर हिटर्स, पन्हाळा फायटर्स आणि तोरणा स्टायकर्स या इतर संघांनीही जोरदार खेळ सादर केला. प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांना उत्साहवर्धक सामना पाहायला मिळाला, ज्यामुळे पुनावळे प्रीमियर लीग २०२६ ने स्थानिक क्रिकेटच्या प्रतिभेला उजाळा दिला. संपूर्ण स्पर्धेतल्या उत्कंठावर्धक मॅचेसमुळे स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, तर आगामी क्रिकेटपटूंसाठीही ही स्पर्धा प्रेरणादायी ठरली.
पुनावळेतील तरुण आणि ज्येष्ठांनी एकत्रित व्हावे. त्यामध्यमातून एकोपा निर्माण व्हावा. या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली. रायगड किंग्ज्चा हा विजय फक्त आजच्या मॅचचा नाही, तर संपूर्ण संघाच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा परिणाम आहे. आम्ही भविष्यकाळातही स्थानिक क्रिकेटला उजाळा देत राहणार आहोत. रायगड किंग्स प्रत्येक स्पर्धेत जोरदार प्रदर्शन करतील याची आम्ही हमी देतो.
– राहुल काटे, संघ मालक.




