नियोजित माता रमाई स्मारकात शिल्प सृष्टी उभारण्यासाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करा – बाबा कांबळे
![Provide Rs. 25 crore for erection of sculptures at planned Mata Ramai Memorial - Baba Kamble](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pjimage-2021-12-21T165652.922.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या मागील परिसरामध्ये माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे कष्टकरी जनतेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. पालिकेच्यावतीने उभारण्यात येणा-या स्मारकामध्ये महामाता रमामाई भीमराव आंबडेकर यांचा पुतळा आणि रमामाईच्या कर्तुत्वाला व त्यागाला साजेसे रमामाई शिल्पसृष्टी स्मारक पालिकेने उभारावे. यासाठी 25 कोटी रूपयांची तरतुद तातडीने उपलब्ध करून दयावी अशी मागणी कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे.महापौर उषा ढोरे यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे. मंगळवारी (दि. 21 डिसेंबर) पिंपरी येथे आयोजित यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महिला आघाडी अध्यक्षा अनिता साळवे, रेबापलिकन युवा मोर्चा अधक्ष मेघा आठवले, आशा बाबा कांबळे तसेच अंजना गायकवाड, भिमशाही युवा संघटना अध्यक्ष शिवशंकर उबाळे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमामाई आंबेडकर हे तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. रमामाई यांच्या जयंतीदिवशी 2020 साली देशातील पहिले फक्त महिला रिक्षा चालकांचे रिक्षा स्टँड पिंपरी चिंचवडमध्ये महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरु केले आहे. नियोजित स्मारक भावी पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हावे यासाठी सन 2016 पासून आम्ही मागणी करीत आहोत असेही कांबळे यांनी सांगितले.