संभाजी ब्रिगेड व छावा संघटनेच्या नेत्यांवर भ्याड हल्ल्यां विरोधात निषेध आंदोलन
महायुती सरकार विरोधात मराठा संघटनांचा आक्रोश

पिंपरी-चिंचवड : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आज पिंपरी येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे पार पडले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रदर्शनात सहभागी कार्यकर्त्यांनी “जय जिजाऊ”, “जय शिवराय”, “हल्लेखोरांना अटक करा” “या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय” अशा जोरदार घोषणा देत, तसेच अधिवेशन चालू असताना सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्ते खेळतात म्हणून या आंदोलनात पत्त्याचा डाव मांडत माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला या प्रकाराचा निषेध केला. आंदोलनादरम्यान नेत्यांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड व छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की,अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आमचा आवाज दाबला जाणार नाही.
हेही वाचा – बॉम्ब, बंदूक, पिस्तुलसमोर संविधानाचा विजय होतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान

सामाजिक न्यायासाठी आणि बहुजन हितासाठी आमचा लढा अधिक तीव्र होईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा संघटना, मराठा सेवा संघ,छावा मराठा युवा महासंघ,कष्टकरी संघर्ष महासंघ,छावा मराठा सेना, जिजाऊ ब्रिगेड,राष्ट्रीय छावा संघटना,राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) विर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांच्यासह पुरोगामी विचारांचे तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते उपस्थित होते.





