एमआयटी कॉलेजमध्ये निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांच्या संवाद व निवेदन कौशल्य विकासासाठी ७४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी : विद्यार्थी विकास मंडळ एमआयटी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाली
ही कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश्य म्हणजे महाविद्यालयातील सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन,सभा, चर्चासत्रे आणि परिषदांसाठी निवेदन कौशल्य विकसित करणे हा होत.
या कार्यशाळेसाठी रुचिका भोंडवे यांनी मार्गदर्शन केले. निवेदन कसे करायचे, आवाजात चढ उतार कसा आणायचा, कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट कशी लिहायची त्याचबरोबर निवेदनात असलेल्या नोकरीच्या संधी याबाबत त्यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. पल्लवी महागावकर यांनी केले होते.
हेही वाचा – पुण्यात ई-कचरा व्यवस्थापनासाठी ‘ग्रीन बाईट’ प्रकल्पाची अंमलबजावणी
या कार्यशाळेत एमआयटी कॉलेज सह पिंपरी चिंचवड मधील इतर महाविद्यालयातील एकूण 74 विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही कार्यशाळा महाविद्यालयाचे संचालक डॉ. वाफारे आणि उपसंचालिका प्रा. अक्षदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
तसेच या कार्यशाळेसाठी डॉ. सुप्रिया लोंढे, डॉ. संदीप ढवळे, डॉ सुरेखा गायकवाड, प्रा. मनीषा पाटील, प्रा.वसंत करमाड, प्रा. सोनाली वळसे, प्रा.जीवन कसबे या सदस्यांचे सहकार्य लाभले.




