breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी : १०० व्या नाटय संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर ६ व ७ जानेवारी २०२४  दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी -चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला व उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक राजेंद्र जैन, उपायुक्त क्रीडा विभाग पिं चिं महानगर पालिका चे मिनिनाथ दंडवते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्विय सहायक विकास पाटील, नाटय संमेलनाचे मुख्य नेपथ्यकर श्याम भुतकर,सुदाम परब, संतोष पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्य सभामंडपाची पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला.

मुख्य सभामंडपाच्या तयारी विषयी माहिती देताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, संपूर्ण मैदानावर तब्बल ६५ हजार स्क्वेअर फुटांचा मांडव नाट्य संमेलनासाठी घालण्यात आला असून यामध्ये ५ हजार रसिक प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्य संमेलनात दोन दिवसांत भरगच्च कार्यक्रम असल्याने कलाकारांच्या सोईसाठी ५ ग्रीन रूम, एक वातानुकूित व्हीआयपी रूम तयार करण्यात आली आहे. तसेच सभा मंडपात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. मुख्य सभामंडपाला ‘सूर्यमाला सभामंडप’ असे नाव देण्यात आले असून रंगमंचाला ‘आद्यनाटककार कै विष्णुदास भावे रंगमंच’ असे नाव देण्यात आले आहे. तर प्रवेशद्वाराला पै क्रांतिवीर चाफेकर बंधू प्रवेशद्वार व महान साधू मोरया गोसावी प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली आहेत.

हेही वाचा   –   ‘हिट अँड रन’च्या काळ्या कायद्याविरोधात वाहतुकदारांचा आंदोलनाचा इशार

नाटय संमेलनाच्या तयारी विषयी समाधान व्यक्त करताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ज्या प्रमाणे नाट्य रसिकांना या १०० व्या नाट्य संमलेनासाठी उत्सुकता आहे. तसेच आम्ही देखील उत्सुक आहोत. याच उद्योग नगरीत आम्ही २०१६ मध्ये ८९ वे साहित्य संमेलन घेतल्यामुळे आयोजनासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची आम्हाला कल्पना आहे. भाऊसाहेबांनी ही सगळी तयारी अगदी कमी वेळात केली. शिवाय प्रत्येक कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करणे हे भाऊसाहेबांचे वैशिष्ट्ये आहे, यामुळेच त्यांनी नाट्य संमेलनाच्या सजावटीची जबाबदारी राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कला दिग्दर्शक श्याम भूतकर यांची निवड केली. शिवाय पिंपरीत झालेल्या ७९ व्या नाट्य संमेलनाचा मांडव ज्यांनी घातला होता त्यांनीच १०० व्या नाट्य संमेलनाचा मांडव घातला आहे. तसेच मुख्य सभामंडपात आजवर झालेल्या ९९ नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचे फोटो लावण्यात आले आहेत. नाटय संमेलनाच्या प्रत्येक बाबीमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, त्यामुळे हे १०० वे नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल याविषयी काही शंका नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button