Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

शिक्षण विश्व : सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी प्रतिभा कॉलेजचे विद्यार्थी सज्ज

‘क्लब ऑफिसर’ म्हणून विद्यार्थ्यांची निवड; क्विक हिल फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

पिंपरी | सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या क्विक हिल फाउंडेशनच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागृती निर्माण करणे, विविध कार्यशाळा, परिसंवाद आणि सायबर गुन्ह्यांविरोधात सशक्त जनजागृती मोहिमा राबविणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महाविद्यालयात झालेल्या विशेष बैठकीत संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका तेजल शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया आणि क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

या कार्यक्रमात प्रतिभा महाविद्यालयातील नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असलेल्या काही उत्साही विद्यार्थ्यांची ‘क्लब ऑफिसर’ म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर सायबर सुरक्षा विषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

हेही वाचा       :        पालखी सोहळ्याने एसपीजी इंटरनेशनल स्कूल गजरात निनादले!

यावेळी क्लबच्या पदग्रहण समारंभात अनुपमा काटकर यांच्या हस्ते अधिकृत क्लबची स्थापना झाली. क्लबमध्ये श्रावणी सामंत अध्यक्ष, आकाश ठाकूर सचिव, ओलीव वर्गिस उपक्रम प्रमुख, तर मानसी वाडेकर मीडिया प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. शिक्षक समन्वयक म्हणून डॉ. हर्षिता वाच्छानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी फाउंडेशनचे असोसिएट डायरेक्टर अजय शिर्के, सीएसआर एक्झिक्युटर गायत्री पवार-केसकर आणि दीपू सिंघ यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

सायबर सुरक्षित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

विद्यार्थ्यांना या मोहिमेसाठी क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा विषयक विशेष प्रशिक्षणही देण्यात आले असून, या माध्यमातून समाजात सायबर जागरूकतेचा जागर सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होणार असून, हे पाऊल सायबर सुरक्षित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button