TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान आवास योजना : मोशी, वाल्हेकरवाडीतील घरांकरिता अर्जासाठी मुदतवाढ

पिंपरी | निगडी प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या मोशी (पेठ क्रमांक 12) आणि वाल्हेकरवाडी (पेठ क्रमांक 30 आणि 32) येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) आर्थिक दृष्ट्या मागास (इडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलायजी) नागरिकांसाठी असणाऱ्या घरांचे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. सुमारे 1604 घरांसाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्यासाठी आता नागरिकांना तीन नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने मोशी (पेठ क्र.12) येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत EWS गटाकरिता (अनुसूचित जमाती(ST) करिता 29 सदनिका व विमुक्त जाती (DT) करिता 2 सदनिका) 31 सदनिका व LIG प्रवर्गातील 793 सदनिका आहेत.
तर वाल्हेकरवाडी (पेठ क्र.30-32) येथील EWS (1RK) प्रवर्गातील 366 सदनिका व LIG (1BHK) प्रवर्गातील 414 सदनिकांचा सर्व सुविधांनी युक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात येत आहे. प्रकल्पातील घरे डिसेंबर 2022 पूर्वी ताबा देणेचे नियोजीत आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्याची मुदत दि.18/10/2022 रोजी संपुष्टात येणार होती. परंतु, नागरिकांच्या विनंतीवरुन ही मुदत दि. 03/11/2022 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यानुसार दि.02/11/2022अखेर नोंदणी करुन नागरिक दि.03/11/2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. अर्जदारांना अर्ज करण्याकरिता ही शेवटची संधी उपलब्ध करुन देणेत आलेली आहे, त्याचा (PMAY) जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button