breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Politics : महाराष्ट्र संकटात असताना भाजप राजकारणाची एकही संधी सोडत नाही : संजोग वाघेरे पाटील यांचा आरोप

पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू आहे. महाराष्ट्रातील लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशावेळी सरकारी तिजोरीत येणारा पैशाची आवक थांबली आहे. यावेळी अनेक कार्पोरेट कंपन्याकडून सरकारला मदतीसाठी धावून आले असताना त्यांच्या मदतीवरती निर्बंध आणण्यासाठी भाजप कडून जाणिवपूर्वक राजकारण करत असल्याची टीका पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

राज्यात लॉक डाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंद बंद आहेत. अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे व राज्यातील सरकारी तिजोरीत येणारे पैसे आवक बंद झाली आहे. त्यावेळी शासनाकडून अनेक लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी covid-19 ” या खात्यात देणगी देण्यात अनेक खाजगी व कार्पोरेट कंपन्यांनी मोठे योगदान दिले. मात्र या कार्पोरेट कंपन्यांनी दिलेले योगदान सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) फंड म्हणून गृहीत धरला जाणार नाही असे परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढले. मागील वर्षी महाराष्ट्रात पूरसदृश्य परिस्थिती असतानाही पश्चिम महाराष्ट्रावरती भाजपकडून राजकारण केले त्याची फळे त्यांंनी विधानसभा निवडणुकीत भोगली आहेत. यापूर्वी राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता थेट पंतप्रधान मदत निधीस मदत केली. राज्यात भाजप विरोधी महाविकास आघाडी सरकारला भाजपकडून कोंडी करण्याचे संधी सोडत नाही. भाजपकडून सर्वसामान्य नागरिकांशी होणारेे कुटील राजकारण थांबवावे अशी मागणी वाघेरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या परिपत्रकामुळे मुख्यमंत्री सहाय्यता मदत करणाऱ्या कंपन्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचा फटका मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बसणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे फडणवीस सरकार असताना वृक्षलागवडीच्या प्रकल्पाला मुंबई-पुण्यातील अनेक कंपन्यांकडून सीएसआरचा निधी तात्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणावर जमा केला होता. तो निधी वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला होता. महाराष्ट्रात कोरोना याचे मोठे संकट आहे. महाराष्ट्रात भाजप विरोधी महाविकास आघाडीचे सरकार असल्याने केंद्रातील मोदी सरकार राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने वृक्ष पेक्षा माणसाचा जीव  वाचवण्यासाठी का होईना भाजपकडून असे राजकारण थांबवावे अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button