राजकीय संवेदनशीलता: राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्याकडून लांडगे कुटुंबियांचे सांत्वन!
![Political sensitivity: NCP MLA Rohit Pawar consoled the Landge family!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Rohit-Pawar-780x470.jpeg)
पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहीत पवार यांनी भेट दिली. भाजपा आमदारांना दु:खात सहभागी होत आमदार रोहीत पवार यांनी राजकीय संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे.
आमदार लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. लांडगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी आमदार रोहीत पवार भोसरीत आले होते. त्यांनी लांडगे कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, युवा नेते विराज लांडे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर शोक व्यक्त करीत आमदार लांडगे यांच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Rohit-Pawar-1-1024x576.jpeg)