पोलीस प्रशासन जागे व्हा! शहरात वाहन चोरीचे सत्र अद्यापही सुरूच
![Police administration wake up! The vehicle theft season still continues in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/bike-2.jpg)
पिंपरी |
शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. भोसरी आणि वाकड मधून प्रत्येकी एक दुचाकी आणि निगडी मधून एक रिक्षा चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोसरी मधील शिवगणेश नगर मधून 15 हजारांची दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार 23 जून रात्री दहा ते 24 जून सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत घडला. किसन तात्याराव बिरादार (वय 38, रा. शिवगणेश नगर, धावडेवस्ती भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराच्या पार्किंग मधून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
वाहन चोरीचा दुसरा प्रकार सेक्टर 24, निगडी प्राधिकरण येथे बुधवारी (दि. 7) दुपारी अडीच ते पावणेचार वाजताच्या कालावधीत घडला. मुस्ताक हुसेन सय्यद (वय 45, रा. सेक्टर 24, निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद यांची 70 हजार रुपये किमतीची रिक्षा (एम एच 14 / सी यु 1623) अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा त्यांच्या घरा जवळून चोरून नेली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत. वाहन चोरीचा तिसरा प्रकार डांगे चौकाजवळ दत्त मंदिर रोडवर असलेल्या सार्वजनिक पार्किंग मध्ये गुरुवारी (दि. 8) दुपारी घडला. विपुल डेविड गडकर (वय 27, रा. खडकी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गडकर यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 12 / पी यु 7471) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता चावीसह चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.