ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडी ते मार्केट यार्ड पीएमपीएमएल बससेवेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दापोडी येथील क्र. ११ मंत्री निकेतन बस स्टॉप येथून मार्केट यार्डपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीएमपीएमएल बससेवेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

दापोडी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना शहरातील महत्त्वाच्या भागांशी अधिक सुलभ, सुरक्षित आणि परवडणारी प्रवास सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या मार्गामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठी मदत होणार असून वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, नगरसदस्या स्वाती माई काटे, प्रतिक्षा लांघी-जवळकर, नगर सदस्य राजू बनसोडे, अप्पर डेपो मॅनेजर सुनिल दिवाणजी, ट्राफिक मॅनेजर यशवंत हिंगे, समन्वयक गणेश कवठेकर तसेच बसचे चालक मनीष चितल्लू आणि वाहक योगेश जगताप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा     :                युद्धजन्य परिस्थितीत ‘टीम इंडिया’ने एकजुटीने लढावं लागेल; पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना परवडणारी व सुलभ प्रवास सेवा उपलब्ध करून देणे, या दृष्टीने अशा बसमार्गांची सुरुवात अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले.

या मार्गावर बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले. परिसरातील नागरिकांकडून या बससेवेची मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत होती. अखेर ही सेवा सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. दापोडी ते मार्केट यार्ड या नव्या बसमार्गामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यातही अशा नागरिकाभिमुख सुविधांना प्राधान्य दिले जाईल.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button