breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवला व्हीएमडीवरून लाईव्ह प्रेक्षपणाद्वारे पालखी सोहळा

स्मार्ट सिटीचा उपक्रम; भाविकांनी घेतले आपापल्या भागातून पालखी सोहळयाचे दर्शन

पिंपरी : विठू नामाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम… असा जयघोष करत आषाढीवारी पंढरपूरच्या दिशेने निघालेला जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयाने आज सायंकाळी पिंपरी चिंचवड येथे प्रवेश केला. या भक्तीमय पालखी सोहळयाचे शहरातील भाविक भक्तांना प्रत्यक्ष दर्शन होण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आणि रविवारी दोन दिवस व्हीएमडी स्क्रीनवर थेट लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले. शहरातील नागरिकांनी हेची देह… हेची डोळा… जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अनुभवला. चौकाचौकातून केलेल्या सोहळयाच्या लाईव्ळ प्रेक्षपणाद्वारे पंचक्रोशीतील अबालवृध्दांनी या पालखी सोहळयाचे दर्शन घेतले. या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी कौतुक करत महापालिकेचे आभार मानले.

महानगरपालिका व स्मार्ट सिटी यांच्यावतीने सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची कर्मभूमि असलेल्या देहूनगरीतील इनामदार वाडयातील पहिला मुक्काम संपवून शासकीय महापूजेनंतर तुकोबांचा पालखी सोहळा हा वैष्णवांचा मेळा हरिनामाचा गजर करीत शनिवारी आकुर्डीकडे रवाना झाला. सायंकाळी निगडी येथे राज्यभरातून या वारीत सहभागी झालेल्या भाविक भक्तांचे महापालिकेच्या वतीने मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. यंदाच्या पालखी सोहळयाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेत पालखी सोहळयातील भाविकांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – T20 विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद

या पालखी सोहळयाचे पिंपरी चिंचवडकरांना आपापल्या भागातून दर्शन घेता यावे, यासाठी आषाढीवारी निमीत्त घेण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त्‍ शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळयाचे थेट प्रेक्षपणाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीतर्फे फेजबुक लाईव्ह, युटयूब लाईव्ह आणि व्हीएमडी स्क्रीनवर सोहळयाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. आठ दिवसांच्या पूर्व तयारीने भक्ती शक्ती, चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक, निगडी प्राधिकरण, रावेत, चाफेकर चौक, चिंचवड गाव, काळेवाडी, पिंपरी गाव, वाकड, डांगे चौक, किवळे, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, रक्षक चौक, दापोडी, भोसरी, दिघी, तळेगाव दाभाडे, चिखली, शाहूनगर, मोशी, तळवडे आयटी पार्क यासह ६० ठिकाणांहून थेट प्रेक्षपणाद्वारे महिला, आबालवृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी न जाता थेट सोहळा पाहता येऊन प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा भास होण्यासाठी स्मार्ट सिटी व एल & टी कंपनीच्या सहयोगाने हजारो नागरिकांनी पालखी सोहळयाचे दर्शन घेतले.

 

महिला, आबालवृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी न जाता पालखी सोहळयाचे लाईव्ह दर्शन घडावे, तसेच पालखी सोहळयाच्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण कमी होण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे प्रथम हा उपक्रम राबविण्यात आला. फेसबुक लाईव्ह, युटूयब लाईव्ह आणि व्हीएमडी स्क्रीन वरील पालखी सोहळयाच्या लाईव्ह प्रेक्षपणाच्या या यशस्वी उपक्रमाद्वारे शहरातील लाखो नागरिक, प्रवासी, अबालवृध्द भाविकांनी दर्शनाचा लाभ घेता आला.

· शेखर सिंह, आयुक्त- पिंपरी चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button