breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

स्थायी समिती सदस्यांनी तपासात सहकार्य करण्याचे आवाहन

पिंपरी । प्रतिनिधी

भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी आज पिंपरी-चिचवडला भेट दिली व तेथे घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली.

या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आ चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात संपुर्ण सहकार्य करावे अशी सुचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या सर्व प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल व या षडयंत्रा मागील चेहरा समाजापुढे उघड होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button