breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शिवसेनेत ‘बारणे पॅटर्न’; शहरप्रमुखपदी सचिन भोसले

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शिवसेनेचा संघटनात्मक ‘रिमोट कंट्रोल’ ताब्यात ठेवण्यात खासदार श्रीरंग बारणे यशस्वी झाले असून, शहर शिवसेनेत आता ‘बारणे पॅटर्न’ पहायला मिळत आहे.

शिवसेना शहरप्रमुखपदी नगरसेवक सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून दिली आहे. भोसले हे खासदार श्रीरंग बारणे यांचे समर्थक आहेत.

माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.योगेश बाबर यांची १७ जानेवारी २०१८ रोजी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बाबर यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. त्यांच्या जागी नगरसेवक सचिन भोसले यांची निवड करण्यात आली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भोसले थेरगावातून महापालिकेवर निवडून आले आहेत. त्यांची पहिलीच टर्म आहे. ते वकील आहेत.

गटनेतेपदी आश्विनी चिंचवडे यांना संधी…

महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी आता खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थक नगरसेविका आश्वीनी चिंचवडे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बारणे यांनी शहर संघटना आणि महापालिकेतही आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button