breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड : ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांना “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार जाहीर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शहरातील एका पत्रकाराचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १२ वाजता काळेवाडी येथील हॉटेल ॲम्बीयन्स या ठिकाणी संपन्न होणार आहे. अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचा या वर्षीचा मानाचा “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार एमपीसीचे संचालक विवेक इनामदार यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बापूसाहेब गोरे यांनी सांगितले की, विवेक इनामदार यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेले भरीव योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार आणि रोख रुपये ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ‘संसद महारत्न’ पुरस्कार प्राप्त मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर नितीन यादव (प्रशासन भूषण पुरस्कार), वाल्मिक कुटे (समाज सेवा पुरस्कार), एम. ए. हुसेन (रुग्ण सेवा पुरस्कार) आणि माधव पाटील (पर्यावरण प्रेमी पुरस्कार) यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

हेही वाचा – ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना दिलासा; १० जानेवारीपासून नवे नियम लागू

पत्रकार दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा मंगळवारी (दि.९ जानेवारी) दुपारी १२ वाजता काळेवाडी, वाकड कस्पटे वस्ती, हॉटेल ॲम्बीयन्स (काळेवाडी फाटा जवळ) येथे आयोजित केलेल्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष पद पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील भूषविणार आहेत.

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय समीक्षक अरुण खोरे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button