पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘हा’ उपक्रम कौतुकास्पद : माजी आमदार विलास लांडे
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाने शहरातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून प्लाझ्मा दान करणाऱ्या दात्यांना प्रोत्साहनात्मक दोन हजार रुपये देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार विलास लांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आहेत. लांडे आणि लांडगे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे.
तसेच, सत्ताधारी भाजपाच्या कारभारावर माजी आमदार लांडे यांनी कायम आसूड ओढला आहे. मात्र, प्लाझ्मादान करणाऱ्या दात्यांना मदत देण्याच्या उपक्रमाचे लांडे यांनी कौतूक करीत सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडवले आहे.
लांडे यांनी ‘सोशल मीडिया’वर व्यक्त होताना म्हटले आहे की, राज्यात महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. प्लाझ्मा दात्यांना महापालिका २ हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत देणार आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णाला प्लाझ्मा वरदान ठरत आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्लाझ्मादात्यांना आवाहन करण्यात येत आहे. या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून २ हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खासगी रुग्णालयांमधील रुग्णांनाही मोफत प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
https://www.facebook.com/VilasLandeOfficial/photos/a.267169626778063/1810062382488772/?__cft__[0]=AZVWYoMn_onekEikbSNpLJx1soSmxDudLD-lZ3dIEOMuMb6QAyzFzXFDc3sgTAKlhnJZNxKGoAdqc-wOrUAHlnt1cJ–PfAXtdEgyIHALG5R6u5tzI7n4_k4Ts_5B0rQvBDL7cH6QRTIPm26gYxxm6kq&__tn__=EH-R