breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुपरस्पेशालिटी कर्करोग रुग्णालय उभारावे; आमदार अण्णा बनसोडे यांची मागणी

पिंपरी । प्रतिनिधी
बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर पिंपरी-चिंचवड शहरात सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात उपचार मिळावेत, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सुपरस्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी पिंपरीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली. याबाबत बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार, श्रमिकांची नगरी आहे. या शहरात महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून नागरिक वास्तव्यास आले आहे. शहरात सुमारे 30 ते 32 लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, याकरिता त्यांना सोई-सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यात जीवनशैलीतील बदलांमुळे नागरिकांना गंभीर आजारांची लागण होत आहे.
पण, सामान्य माणसांना हे लवकर समजून येत नाहीत. ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषता कर्करोग या जीवघेण्या आजारावर वेळेवर उपचार घेतले नाहीत तर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून रुग्णास चांगले व वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे म्हणून महानगरपालिकेने कॅन्सर रुग्णालय सुरू करावे, असे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले.
शहरातील गोरगरीब रुग्णांना कर्करोगावर या रुग्णालयात अल्पदरात उपचार मिळाले पाहिजेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावर शासकीय दरात उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र सुपरस्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात यावा असे बनसोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button