पिंपरी चिंचवड : महापालिका रुग्णालयातील ॲम्बुलन्स दरवाढीला कीर्तीताई जाधव यांचा विरोध
![Pimpri Chinchwad: Kirti Tai Jadhav opposes the increase in ambulance rates in municipal hospitals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Untitled-design-3.jpg)
पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या ॲम्बुलन्ससह वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शहरातील मनपाच्या सर्व मोफत आरोग्यसेवा आणि मोफत उपचारामध्ये आता शासन नियमाप्रमाणे दरवाढ रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किर्तिताई जाधव यांनी केला आहे.
किर्तिताई जाधव म्हणाले की, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह सर्व रुग्णालये निर्माण करताना कामगार कष्टकरी वर्गाला मोफत उपचार देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यशासनाचे कोणतेही योगदान नसताना महापालिकेने शासन दराने दरवाढ करणे अतिशय चुकीचे आहे.
शिवानंद चौगुले म्हणाले गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी ॲम्बुलन्स सेवा प्रत्येक किलोमीटरला 20 रुपये केल्याने रुग्णांना त्याचा आर्थिक बोजा पडत आहे.
यापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये सुमारे 110 रुपयात मिळणारी सेवा आता किमान ₹500 ते 1000 रुपये मोजावे लागत आहे.
सदर दरवाढ तात्काळ मागे घेऊन पूर्वीचे दर अमलात आणावे अशी मागणी केली आहे.