पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी!
ताप, सर्दीमुळे रूग्णालयात दाखल झाला होता रुग्ण : दहा दिवसांच्या उपचारांनंतर मृत्यू; रुग्ण ओला-उबेर चालक

पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसने पहिला रुग्ण दगावला असल्याची माहिती समोर आली आहे. 36 वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता. 21 जानेवारीला तो महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र ,उपचारासाठी आला तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता. गेली आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र, बुधवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले,
वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये रुग्णाचा जीबीएस मुळे हा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.. पिंपळे गुरव भागातील हा तरुण ओला-उबेरचा चालक असून तो 21 जानेवारीला वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. तो गाडी चालक असल्यामुळे त्याने कदाचित बाहेरील अन्न आणि दूषित पाणी पिले असल्याची संभावना आहे त्यातूनच त्याला जीबीएस ची लागण झाल्याचे दिसत आहे या व्यतिरिक्त त्याला निमोनिया देखील झाल्याचे आढळून आले होते.
हेही वाचा : ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’; मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान
हा ओला उबेर चालक उपचारांसाठी दाखल झाला तेव्हापासून त्याची तब्येत खालावलेली होती, त्यामुळे पहिल्याच दिवशी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये 21 जानेवारीला हा रूग्ण दाखल झाला होता. ताप, सर्दी आणि अशक्तपणा आल्याने उपचारांसाठी दाखल झाला. तो दाखल झाल्यानंतर चार ते पाच तासांमध्ये त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. एक्सरे तपासणीनंतर रुग्णाला निमोनिया झाल्याचेही निदान झाले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
संबंधित रुग्ण पिंपळे गुरव भागातील आहे. मात्र, तो ओला-उबेरचा चालक असल्याने तो सकाळी घराबाहेर पडायचा. तो सर्वत्र फिरायचा त्यामुळे कोणत्या पाण्याने त्याला त्रास झाला याबाबतची माहिती नाही. तो ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले मात्र, ते पाणी शुध्द असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे कामानिमित्ताने फिरत असताना कोणत्या ठिकाणचे पाणी तिला किंवा काही खाल्ले असेल तर त्याबाबतची माहिती महापालिकेला मिळू शकलेली नाही. त्याचा भाऊ देखील ओला-उबेरचा चालक म्हणून काम करतो.
– लक्ष्मण गोफने, वैद्यकीय विभाग प्रमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका.




