Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहराला पावसाचा जोरदार तडाखा

१३ ठिकाणी झाडे पडली; ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहराला मंगळवारी (दि.20) सायंकाळी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे सव्वातास कोसळलेल्या या पावसाने अक्षरश: पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. या पावसाने दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

गेल्या चार दिवसांपासून शहरात दररोज दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारीही सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दिवसभर या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी साडेतीननंतर अचानक ढग दाटून आले. चार वाजता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसास सुरूवात झाली. अचानक आलेल्या पावसाने कामावरून सुटलेल्या कामगारांची, महिला वर्गाची तसेच, वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडवली. सुमारे सव्वातास पडलेल्या या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले. त्यामुळे अक्षरश: पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा   :    सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्या

पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पिंपरीतील अजमेरा कॉलनी, चिखलीतील मोरेवस्ती, भोसरी एमआयडीसी चौकालगत, इंद्रायणीनगर या भागात सखल ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून वाहने काढताना कसरत करावी लागत होती. शहराच्या काही भागात वीजपुरवठाही खंडीत झाला.

13 ठिकाणी झाडपडीच्या घटना

  • पावसामुळे शहरात 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने या
  • घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पिंपरीत अशोक थियटरजवळ, चिखलीत
  • स्पाईन रोड तसेच राधाकृष्ण हॉटेलजवळ, शिवतेजनगर येथे गणपती मंदीराजवळ,
  • जगताप डेअरी, आकुर्डीतील खंडोबा माळ तसेच ऐश्वर्यम सोसायटीजवळ, तळवडेतील
  • ज्योतिबानगर, निगडी – यमुनानगर, शाहूनगर, चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजजवळ,
  • जी ब्लॉक शाहूनगर या ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button