पिंपरी / चिंचवड
पिंपरी चिंचवड रविवारी कोरोनाचे 175 नवीन रुग्ण
![In the last 24 hours, 10 thousand 273 patients were registered in the country and 243 died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/coronavirus-2.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 2) दिवसभरात 175 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 171 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 79 हजार 423 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 75 हजार 160 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात 468 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 234 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 234 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 8 हजार 129 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 29 लाख 82 हजार 257 जणांनी लस घेतली आहे.