राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी
शिक्षण विश्व: इयत्ता १०वीचा १००% निकाल; संस्थेचा अभिमान

पिंपरी-चिंचवड | डुडूळगाव येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डूडूलगाव शैक्षणिक संकुलातील ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा इयत्ता १०वीचा CBSE परीक्षा निकाल यंदा १००% लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
या निकालात कु.मयुरी मस्करे (91.2%),कु.श्रेया खोत (91%) कु. हर्षिता सूर्यवंशी (91%), कु.श्रद्धा सोळंकी (91.2%), साई सतीश पाटील (90.2%), लुकेश निलेश नेहेते (90%) विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले आहे. शाळेतील एकूण 71 विद्यार्थ्यांपैकी 56 विद्यार्थ्यांना वैयक्तिक विषयांमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. ही सुद्धा एक कौतुकास्पद बाब आहे विद्यार्थ्यांच्या या यशासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव, संस्था आणि पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे प्राचार्या डॉ. उर्मिला जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा : आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलचा १० वीचा निकाल १०० टक्के!
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार मा. श्री. विलासराव लांडे, सचिव श्री. सुधीर मुंगसे, कोषाध्यक्ष श्री. अजित गव्हाणे तसेच विश्वस्त श्री. विक्रांत लांडे व प्रा. श्री. किरण चौधरी, श्री. प्रमोद बोचरे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
या यशाचे श्रेय प्राचार्या डॉ. उर्मिला जाधव, समन्वयिका सौ. कल्याणी केऱ्हाळकर, सौ. अमृता विळसकर व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाला जाते. तसेच यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेची इयत्ता 10 वी ची ही पहिली बॅच आहे. संस्थेच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुकाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.





