अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू
![Tragic accident on a devotee's train from Shirdi to Shanishinganapur; Four killed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Tragic-accident-on-a-devotees-train-from-Shirdi-to-Shanishinganapur.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात जखमी झालेल्या पादचा-याचा मृत्यू झाला. ही घटना चऱ्होली येथे 12 मे रोजी घडली.
आरिकदास प्रभुदास कुजूर (वय 50, रा. चऱ्होली,मुळगाव भोपाळ, मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सहादु बोरडे यांनी मंगळवारी (दि. 17) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आरिकदास हे 12 मे रोजी रात्री दहा 13 मे रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास पठारे मळा येथून पायी चालले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. 13 मे रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास आरिकदास हे जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.