breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#pcmc: सोशल मीडियावर ‘मास्क फॉर सेफ’ मोहीम

पिंपरी |महाईन्यूज| प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवडकरांच्या आरोग्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी ‘मास्क फाॅर सेफ’ पीसीएमसी या नावाने हॅशटॅग ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली. या मोहीमेअंतर्गत प्रत्येक नागरिक मास्क घालून सोशल मीडियावर फोटो अपलोड करु लागला आहे. मात्र, शहरात जनता संचारबंदी फेल गेली तरी ‘मास्क फाॅर सेफ’ मोहीम हिट ठरु लागली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील नागरिकांना कोराेनाची साखळी तोडण्यासाठी जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन महापाैर, आयुक्तांनी केले. मात्र, नागरिकांनी स्वताःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन विनाकारण बाहेर फिरण्याला अधिक पसंती दिलेली दिसतेय. याचाच फटका म्हणून शहरात दररोज शेकडो कोरोना रुग्ण पाॅझिटिव्ह सापडू लागले आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांनाकडून दोन महिन्यांपासून दंडात्मक कारवाई सुरू केलीय. यातून लाखो रुपये दंड वसूल केला आहे. तसेच रस्त्यावर पान, गुटखा खाऊन थुंकणा-यावर कारवाई करण्यात येतीय. लोकांच्या थुंकीमधूनही विषाणूचा प्रसार होत असल्याने या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रबोधन होण्यास मदत होत आहे.

‘आपल्या पिंपरी चिंचवडचे करू रक्षण, वापरू मास्क आणि करू संरक्षण’, ‘आता हे आपले रोजचेच टास्क करोनाला हरविण्यासाठी वापरूया मास्क’, ‘अनेकांच्या कष्टाने घडले आपले महानगर, मास्कसह जगेन कारण मी आहे खरा पिंपरी- चिंचवडकर’, ‘बैलगाडी ते ऑडी असा प्रवास करणारे आपले शहर, मास्क वापरीन कायम मी आहे खरा पिंपरी- चिंचवडकर,’ अशा आशयाचे प्रबोधनात्मक आशय ऑनलाइन फिरत आहे.

नागरिकांनी मास्ककडे बोट दाखविणारा फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मास्क वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड आणि हनुवटीवर मास्क ठेवावा. सहा तासानंतर किंवा ओला मास्क लगेच बदलावा. डिस्पोजल मास्क पुन्हा वापरू नये. मास्कच्या बाहेरील भागास स्पर्श करू नये. तसेच, मास्क वापरल्यानंतर तो बंद कचरा पेटीत टाकावा, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button