पार्थ पवार यांचे आवाहन : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा!
![Parth Pawar's appeal: NCP workers should take initiative for blood donation!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/parth-pawar-pcmc.jpg)
- पिंपरी-चिंचवडमध्ये रक्तसाठा तुटवडा
- राष्ट्रवादीचे युवा कायकर्ते पुढाकार घेणार
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या प्रामुख्याने ए, एबी आणि बी पॉझिटिव्ह रक्तगटाची कमतरता जाणवत आहे. विशेष म्हणजे, शहरातील रक्तपेढ्यांमध्ये अल्पसाठा शिल्लक आहे. गंभीर शस्त्रक्रिया, अपघात, महिलांची प्रसूती आदींसाठी प्रामुख्याने रक्ताची गरज असते. तयाशिवाय थॅलसेमिया झालेल्या रुग्णांचे रक्त देखील वारंवार बदलावे लागते. रक्ताला सध्या दुसरा पर्याय उपलब्ध नाही. विविध उपचारांवरील शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले रक्त मिळावे म्हणून नागरिक सध्या रक्तपेढ्यांमध्ये चकरा मातर आहेत.
यापार्श्वभूमीवर युवा नेते पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांनी जास्तीत-जास्त रक्तदान करावे. तसेच, रक्तदान शिबिरांचेही आयोजन करावे, असे पार्थ यांनी म्हटले आहे.
I am hearing repeated stories of Pimpri-Chinchwad running out of blood at several blood banks. I appeal to all youth karyakartas of NCP in PCMC area to come out in big numbers to donate blood. I am also organising a donation drive – stay tuned to join in. pic.twitter.com/Vo7YI4NYtJ
— Parth Pawar (@parthajitpawar) October 5, 2021