ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
माजी नगरसेवक दिवंगत लक्ष्मण गायकवाड यांच्या स्मरणार्थ पिंपरीत पाणपोई
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक, आरपीआयचे कार्यकर्ते लक्ष्मणराव गायकवाड व राजेंद्र वंजारे यांच्या स्मरणार्थ मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन गायकवाड व वंजारे कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी पिंपरीत पाणपोई सुरु करण्यात आली आहे.मानवता हिताय सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांच्या उपस्थितीमधे हा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व गायकवाड व वंजारे कुटुंबीय, तसेच आरपीआई वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे, धुराजी शिंदे, नितुल पवार, गणेश आहेर, विशाल वाली, चंद्रकांत बोचकुरे, सतिश भांडेकर, दिपक म्हेत्रे, बळीराम काकडे, मनोज गजभार, अजय शेरखाने, अजय धोत्रे, अतुल धोत्रे, अॅड. अतुल धोत्रे उपस्थित होते.