Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

इंटर झोनल मैदानी स्पर्धांमध्ये पीसीपी च्या दिनेश फड आणि रिद्धीश्री वानागुट्टे यांची उत्तुंग कामगिरी

पिंपरी :  इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन आणि शासकिय तंत्रनिकेतन पुणे यांच्या वतीने तंत्रनिकेतन विद्यालयांच्या इंटर झोनल मैदानी स्पर्धा सणस क्रिडा संकुल, पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन महाविद्यालय (पीसीपी) संघाने ९ पैकी ५ क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट यश संपादन केले .

दिनेश फड या विद्यार्थ्याने लांब उडी, उंच उडी आणि तिहेरी उडी या क्रिडा प्रकारांत पहिला क्रमांक पटकावला.
मुलींमध्ये रिद्धीश्री वानागुट्टे हिने ४०० व ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला प्राचार्य डाॅ. विद्या बॅकाॅड, संघ व्यवस्थापक राहुल चव्हाण, कुणाल गव्हाणे, अविनाश जगदेव, अतुल सावळे, पुनम तेरणीकर, मोनिका चिपरीकर, शिल्पा गिटमे, क्रिडा समन्वयक सुनिल जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थकुरडे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा –  नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज स्पर्धेत पीसीसीओइला प्रथम क्रमांकासह पाच लाखांचे बक्षीस

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button