भोसरीत ‘घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे’ आयोजन
कविता भोंगाळे-कडू यांच्या वतीने आयोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Gauri-Ganpati-Decoration-Competition-Bhosari-780x470.jpg)
वर्ष चौथे; आकर्षक बक्षिसांची मेजवानी
पिंपरी । प्रतिनिधी
भाजपा महिला मोर्चा आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे हे चौथे वर्ष असल्याची माहिती आयोजक कविता भोंगाळे-कडू यांनी दिली.
कविता भोंगाळे-कडू म्हणाल्या की, गौरी गणपती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मराठी माणसाच्या मनाचा हळवा कोपरा असून, मोठ्या भक्ती भावाने हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. महिला वर्गाकडून होणारी घरगुती गौरी गणपतींची सजावट लक्षात घेता भाजपा महिला मोर्चा व कविता भोंगाळे युवा मंच यांच्या संयुक्त विदयमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘प्रत्येक घरात बहीणीचं कल्याण बघणारा भाऊ नसतो’; सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान
या स्पर्धेतील सहभाग निशुल्क असून या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धकांनी आपली नावनोंदणी २१ सप्टेंबर २०२३ पूर्वी 9922086200, 9359572088 या मोबाईल क्रमांकावर करावी. त्यानंतरच परीक्षकांकडून सजावटीचे परीक्षण करण्यात येईल व अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
आकर्षक बक्षिसांची मेजवानी
या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास गॅस शेगडी, तर व्दितीय विजेत्यास मिक्सर व तृतीय विजेत्यास इलेक्ट्रिक शेगडी अशी बक्षीसे देण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी प्रत्येक गणेशभक्तास आकर्षक भेटवस्तू व उत्तेजनार्थ बक्षीस पैठणी साडी देण्यात येणार आहे.