Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नेत्रचिकिस्ता शिबीर : सर्वसामान्य नागरिकांची रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा!

भाजपाचे मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार

इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीलम लांडगे यांचे सहकार्य

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
इंद्रायणी नगरमध्ये झालेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिरातून स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे इंद्रायणी नगर मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे आणि इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीलम लांडगे यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘‘सेवा पंधरवडा’’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित शिबिरामध्ये 63 रुग्णांची मोफत मोतीबिंदू ऑपरेशनासाठी निवड करण्यात आली असून, ही शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 353 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते, हे ओळखून नागरिकांना घराच्या दारापर्यंत नेत्रचिकित्सा सेवा पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न यामागे आहे.

शिबिराचे आयोजन इंद्रायणी नगर, सेक्टर 12 येथील बी-क्लस्टर क्लब हाऊस, स्वराज्य नगरी येथे करण्यात आले होते. शिबिरात नेत्रतपासणी, मोतीबिंदू निदान, चष्मा वाटप आणि उपचाराचे मार्गदर्शन देण्यात आले.

हेही वाचा –  PCMC : हरनाम सिंह ते शेखर सिंह पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी ‘‘एक पाऊल पुढे’’

समाजभान जपणारा उपक्रम…

या शिबिरामुळे अनेक नागरिकांना वेळेवर उपचार मिळून अंधत्व टाळण्यास मदत झाली. “नागरिक त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यांसारख्या संवेदनशील बाबतीत याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हे लक्षात घेऊनच मोफत आणि दर्जेदार सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा संकल्प केला आहे,” असे शिवराज लांडगे यांनी सांगितले.

पुढील उपक्रमांची तयारी….

केवळ एकदाच नव्हे, तर या धर्तीवर भविष्यातही अनेक आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करून अधिकाधिक लोकांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. शिवराज लांडगे यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारा आणि अनेकांना दृष्टी देणारा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद ठरत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“डोळ्यांचा प्रकाश ही केवळ दृष्टी नव्हे, तर माणसाच्या जगण्याची दिशा असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला योग्य वेळी आरोग्यसेवा मिळाली पाहिजे, हाच आमचा खरा संकल्प आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे गरजूंच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहोत.”

— शिवराज लांडगे, मंडल अध्यक्ष, भाजपा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button