ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि इएल माईंडस्पार्क तर्फे EdTech (शैक्षणिक तंत्रज्ञान) आणि PAL – Personalised Adaptive Learning (वैयक्तिक अनुकूल शिक्षण पद्धती) या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे करण्यात आले.

महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आणि शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, उप आयुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेस प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच समन्वय अधिकारी सुनिता गीते तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

या प्रसंगी इएल माईंडस्पार्क तर्फे प्रकल्प व्यवस्थापक नमन कुमार तसेच सहाय्यक प्रशिक्षण व्यवस्थापक रीता दाक्षिणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी माईंडस्पार्क या PAL – Personalised Adaptive Learning (वैयक्तिक अनुकूल शिक्षण) सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. ही Artificial Intelligence – AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) वर आधारित डिजिटल शिक्षण प्रणाली असून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचा अभ्यास करून त्यानुसार वैयक्तिक मार्गदर्शन करते.

हेही वाचा      :              अजितदादांच्या निधनाचं राजकारण करू नये; गिरीश महाजन यांचा रोहित पवारांना टोला 

माईंडस्पार्क प्रणाली विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजू ओळखून त्यानुसार प्रश्न, सराव आणि शैक्षणिक उपक्रम उपलब्ध करून देते. त्यामुळे गणित व इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत होते आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळते.

या मार्गदर्शन सत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि computentional thinking (संगणकीय विचारप्रक्रिया) या संकल्पनांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २० शाळांमधून प्रत्येकी दोन प्रतिनिधी सहभागी झाले होते. याशिवाय सुमारे ४० मुख्याध्यापक व शिक्षक या सत्रात उपस्थित होते.

डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचा निश्चितच सकारात्मक फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अत्यंत आवश्यक आहे. माईंडस्पार्क सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना शिकण्याच्या पातळीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे गणित व इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून अशा तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी केल्यास महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण मिळण्यास निश्चितच मदत होईल.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर करणे काळाची गरज आहे. वैयक्तिक अनुकूल शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे गणित व इंग्रजी विषयातील संकल्पना अधिक स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. अशा तंत्रज्ञानाधारित उपक्रमांमुळे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षण अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आहे.

– रविना अंगोळकर, सभापती, शिक्षण समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button