पिंपरी / चिंचवड
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/gutkha-karwai.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
गुटखा विक्री प्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 4) सकाळी वाकड मधील काळाखडक झोपडपट्टी येथे करण्यात आली.
सोहमराम रेवतराम देवासी (वय 35, रा. गजानन कॉलनी, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी शरद दुधाळ यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहमराम याने गुटखा विक्रीसाठी आणला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांना आरोपीच्या दुचाकीवर 24 हजार 200 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी त्याची दुचाकी ही जप्त केली. या कारवाईमध्ये एकूण 84 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.