Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांची विक्री

अ क्षेत्रीय कार्यालयातून सर्वाधिक ३५६ तर ग क्षेत्रीय कार्यालायातून १८९ अर्जांची विक्री

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन पत्रे नेण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण २२१२ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज अ, ब, क, ड, इ, फ, ग ह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण २२१२ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

हेही वाचा     :      “आरंभ है प्रचंड!” आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

प्रभागनिहाय विक्री झालेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या –

अ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे ६८, ७८, ६७, १४३ अशा एकूण ३५६ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

ब क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ७९, ९६, ४८, ७७ अशा एकूण ३०० अर्जांची विक्री झाली आहे.

क क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे ६५, २३, ८४, १४३ अशा एकूण ३१५ नामनिर्देशन पत्रांची अर्जांची झाली आहे.

ड क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ८५, ९०, ३४, ८३ अशा एकूण २९२ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

इ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे ६९, ४८, ५५, ३८ अशा एकूण २१० नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

फ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे ३५, ८५, २३, ९१ अशा एकूण २३४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

ग क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे ४२, ४५, ४३, ५९ अशा एकूण १८९ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

ह क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. ३२, ३१, ३०, २० साठी अनुक्रमे ५१, ८३, ११७, ६५ अशा एकूण ३१६ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button