महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने चौक तिथे झेंडा!
पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने चौक तिथे झेंडा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात चिखली, मोशी या ठिकाणी झेंडा कार्यक्रमाचे मोठ्यात उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनासाठी सत्यम पत्रे (उपविभाग अध्यक्ष), विक्रम भोसले (शाखा अध्यक्ष), चेतन कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमासाठी मोशी चिखली भागातील सोसायटी धारक मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होते त्याचप्रमाणे शहरातील सर्व मनसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘भाजप आणि आरएसएसला आजही..’; प्रकाश आंबेडकरांची टीका
फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये, ढोल ताशाच्या गजरामध्ये झेंड्याचे अनावरण मोशी चौकामध्ये करण्यात आले मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले . या कार्यक्रमासाठी उपशहराध्यक्ष , राजू सावळे , उपविभाग , तुषार सोनटक्के, अक्षय देसले, के.के. कांबळे, नितीन चव्हाण, नाथा शिंदे, कैलास दुर्गे, नारायण पठारे , संतोष यादव, आकाश सागरे, मनोज लांडगे, प्रबुद्ध कांबळे, गणेश वाघमारे, वैभव फाळके , वाहतूक सेनेच्या सुनीलजी कदम, उपविभाग अध्यक्ष निलेश नेटके, प्रथमेश घुले, शाखाध्यक्ष प्रेम पवार, काशिनाथ खजूरकर, मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.