breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri-Chinchwad | प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा ओला कॅबचालक अखेर गजाआड

पिंपरी | कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी फरार असलेल्या कॅब चालकास देहूरोड पोलिसांनी अटक केली. विनयभंगाची घटना १४ मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता. राहुल पांडुरंग म्हस्के (रा. थेरगाव) असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी एक महिला कोरेगाव पार्क येथे तिच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जात होती. महिलेने कॅब बुक केली. त्यानंतर महिला राहुल याच्या कॅब (MH 14/LB4133) मधून कोरेगाव पार्क येथे जात होती. राहुल याने कार कोरेगाव पार्क येथे न नेता देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणली. तिथे त्याने महिलेच्या एकटेपणाचा फायदा उचलून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा     –    महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली माहिती

गुन्हा दाखल झाल्यापासून कॅब चालक राहुल हा आपले अस्तित्व लपवून पुणे शहरात वावरत होता. त्याच्याबाबत कोणती माहिती नसताना देहूरोड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत त्याला अटक केली. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्याची कार देखील जप्त केली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पी टी खणसे, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसीन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्निल साबळे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button