पुण्यात रिक्षा संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला, बाइक टॅक्सीवर कारवाईची मागणी
![Officials of the rickshaw association met Raj Thackeray in Pune, demanded action against bike taxis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Raj-Thakre-Rikshaw-Sanghatana-news-780x470.jpg)
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पुण्यातील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी भेटीसाठी गेले होते. यावेळी राज ठाकरेंनी रिक्षा चालकांची विचारपूस करत त्यांच्यासोबत बैठक घेतली. राज ठाकरेंनी रिक्षाचालकांच्या समस्या जाणून घेत त्या मुख्यमंत्र्यांना सांगू, अशी ग्वाही दिली. रिक्षा संघटनांचा बाइक टॅक्सीला विरोध आणि विविध मागण्यांसाठी बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली आहे. या संदर्भात अधिकारी, पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना गेल्या वर्षभरात निवेदने दिली आहेत.
अद्याप बेकायदा बाइक टॅक्सीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी आज राज ठाकरेंना निवेदन दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा बाइक टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या सव्वा लाख रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळेच रिक्षा चालक आणि राज ठाकरेंची आजची भेट ही महत्त्वपूर्ण ठरली आहे.
पुणे शहरात झालेल्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी रिक्षा संघटना आमंत्रित केले होते यामुळे आंदोलन सहभागी झाला रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर विचारांचे प्रश्न मांडले. या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष,अशोक साळेकर, कृती समिती समन्वयक,तुषार पवार, आम आदमी रिक्षा संघटना, केदार ढमाले, बघतोय रिक्षावाला फोरम केशव क्षीरसागर, व इतर सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या.